शिर्षक : *नारी, कालची आणि आजची*
Submitted By: Ms Pranjali Umakant Choudhari
----------------------------------
नारी कालची प्राचीन युगातील नव्हती अबला कधीच ती. कुंती, शर्मिष्ठा, लोपमुद्रा, मंदोदरी गार्गी ,मैत्रेयी ,सीता , द्रौपदी होत्या धगधगत्या अग्निज्वाला. नसे कुणी त्या सम शास्त्रार्थी, विदुषी स्वबळे निर्मिले आपले स्थान तरी त्या न करती कधी अभिमान. वारसा चालवी त्यांचा विज्ञान युगात नाव, रूप नवे घेऊनी, कुणी अहिल्या, कुणी सावित्री कोणी बनली झाशीची राणी. नाव तयांचे कल्पना, सुनीता असे रमाई किंवा किरण बेदी. स्वबळावर उभ्या ठाकल्या भारत मातेच्या या सुपुत्री. नमन तयांना कोटी करुनीतेवविते एक पणती, त्यांच्या चरणी.
----------------------------------
Reg ID: BF25-5136
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.