Submission 1716

पार्थाच्याही मनात शंका घिरट्या घालत आहे

Submitted By: Durvesh Vishwas Paluskar

----------------------------------

पार्थाच्याही मनात शंका घिरट्या घालत आहे एकलव्य स्वप्नात येउनी स्पर्धा मागत आहे धृतराष्ट्राच्या आंधळेपणावर खापर फोडू पण दृष्टी असून गांधारी का डोळे झाकत आहे ? मीरे कर तू माफ तो कधी भेटू शकला नाही अजूनही द्रौपदीस केशव साडी पुरवत आहे युद्धे अन संहार पाहुनी भिती वाटते आता जखमी अश्वत्थामा प्रतिशोधाने धुमसत आहे महाभारताची गाथा तर आहे अपुली गाथा नात्यांचे राजकारण आणि चुलता भांडत आहे युद्ध संपले ह्या दुनियेला गीता सांगुन झाली कान्हा आता राधेच्या प्रेमाला शोधत आहे

----------------------------------

Reg ID: BF25-5089

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

62
Votes
418
Views
11 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top