Submission 1595

विरह...

Submitted By: BUDHAJI RAVINDRA NARVEKAR

----------------------------------

आकाशात उडताना, स्वप्नं सगळी राख, एका क्षणात, आयुष्याने सोडली रे साथ। सिंधूर पुसला हल्ल्याने,थंडीत फुटला घाम, इतिहासात कोरलं,एक नाव "पहलगाम" सिंधूर मिटला,अश्रू सुकले,हास्य दडले ओठी, आसवांच्या जळत्या रेषा,दुःख काळजापोटी। प्रेमाने घरटे विणले,उडताना फुटली आशा, तो क्षण किती काळोखी,ना कळली त्याची भाषा। उरले थोडे अश्रू,अन् आठवणी त्या खास, शेवटी तो काळच होता,घेऊन गेला श्वास। कुणी होता नवरा,तर कुणाचा तरी बाप, पुसून गेलं सारं,राहिली फक्त राख। का कुणाचा द्वेष? अन् का कशाला राग? सोडून द्या ते सारे, रुसवे आणि वाद। जगा ना आनंदात, घ्या सुखाचा आस्वाद, वर्तमान आपला, काय आहे भविष्यात?

----------------------------------

Reg ID: BF25-5063

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

2
Votes
124
Views
1 Year
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top