Submission 3821

बायको

Submitted By: RUTUJA WARGHADE

----------------------------------

निहाळत चिंब सरींची संध्याकाळ, खिडकी पाशी उभी राहते.. जुन्या काही सरींना आठवु पाहते... विचारांची काहुरं कागदावर उमटवावी वाटतात मग, इतक्यात ""कांदाभजी कर गं!!"" नवऱ्याची फर्माईश येते.. कांद्या सोबत तिच्या भावनाही मग कुचकर्ल्या जातात.. श्रावण सरी तिच्यात डोळ्यात मग दाटुन येतात... विचारतं लेकरू मग आईच्या आसवांची कारणे, कांद्याचं कारण सांगुन गालातल्या गालात हसते.. भावनांचे लोट डोळ्याच्या बांधावर ठेऊन, बघ ना बायको किती सुंदर दिसते..!!!!

----------------------------------

Reg ID: BF25-5864

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

18
Votes
344
Views
1 Year
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top