Submission 3725

पावसाच्या दोन थेंबात आयुष्य

Submitted By: Rohit Hiroji

----------------------------------

मे च्या शेवटी आला पहिला पाऊस, गरम उन्हात मातीला लागला ओलसर श्वास, कोणासाठी पावसात गाणी, चहा आणि खिडकी, कोणासाठी गळतं छप्पर आणि काळजी टिकली, शहरात पाऊस म्हणजे छत्रीचे रंग गावात पाऊस म्हणजे मातीचा गंध कधी तो आनंद देतो, कधी अश्रूही आणतो कधी वेळेवर येतो, कधी वाटच पाहतो. शेतकरी म्हणतो, "माझं आयुष्य याच्यावर ठरतं", तर शहरात लोक म्हणतात, "पाऊस म्हणजे प्रेम फुलतं!" पावसामुळे प्रेमी फुलतात चौकात आम्ही शेतकऱ्यांची पोरं मात्र चिखलात शेवटी एवढंच सांगतो मनापासून पाऊस आहे दोघांसाठी वेगळ्या स्पर्शातून तुमचं प्रेम पावसात उमटतं, आमचं आयुष्य त्याच्यावर जगतं.....

----------------------------------

Reg ID: BF25-5824

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

269
Votes
1,416
Views
7 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top