अंतरीचे अंतरे
Submitted By: Amol Anil Chiplunkar
----------------------------------
दाटली मनी भेट आपली जेव्हा गीत हे फुलले होते... मनी दाटल्या अंधारी तेव्हा तव चांदणे दरवळले होते. सावधशा अंतरांतून काही अंतरी चालले होते... हाती पेरल्या स्पर्शाने ही संवाद साधले होते. तेव्हा तव वदनी सजले भाव लाजरे होते... अन् तव ओठांवरीचे मौन बोलके होते. स्पर्शातूनी हृदयांतरी तू सहज छेडल्या तारा... आसूसल्या श्वासात रंगला हिरवा मोर पिसारा. अंतरीच्या प्रीतीत नाहली आपल्यातली अंतरे... स्पर्शाच्या गीतात रंगले स्पंदांचे अंतरे. हातातून हातही सुटला स्पर्श तुझा सुटेना... हृदयावरी जो घातलास तो मंत्र तुझा कळेना. दुभंगल्या होत्या वाटा तेव्हा चांदणे कोवळे होते... अंतरावरूनी गुणगुणले ते अंतरीचे अंतरे होते.
----------------------------------
Reg ID: BF25-5688
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.