सूचतं मला कधी कधी..
Submitted By: Amruta Mangesh Patil
----------------------------------
सूचतं मला कधी कधी म्हणत कोऱ्या कागदावर काय लिहावं समजत नाही, आणि कुठून तरी बघून उतरवून काढणे हे काही मला रूचत नाही. शोधून ,निवडून,वेचून शब्द वापरने माझं कामंच आहे, बाकी,कवितेसाठी डोक्याला ताण देणे मात्र मला भागच आहे. एवढं सगळं करून जाणवलं, अरेच्चा!! अजून कवितांच्या दुनियेत मी मागेच आहे. मग वाटलं, शब्दांची गुंफण किंवा यमक जुळवने म्हणजे थोडंच असते कविता !! उमगलं मला पुष्कळ , सूचतं मला कधी कधी म्हणता म्हणता.
----------------------------------
Reg ID: BF25-5586
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.