बाप, बाप काय असतो...
Submitted By: Prashant Birje
----------------------------------
बाप, बाप काय असतो,हे आयुष्यात दोनदा कळत, एकदा आपला बाप गेल्यावर, एकदा आपण बाप झाल्यावर... बाप म्हणजे,या ब्रह्मांडातील असा देव, ज्यानं आपल्यासाठी रात्रीचा दिवस केला, अन स्वतःच देव असताना सुद्धा, आम्हासाठी हजारो देवांकडे नवस केला. मुलांच्या सुखासाठी,तगमग व धगधग, स्वतःच ताटात वाढून घेणारा तो बाप, पिलांची पोट भरतांना,स्वतःच्या इच्छा आकांक्षासह,गाडून घेणारा तो बाप देव देव म्हणजे आणखी कोण असणार? हा देव एकदा का गेल्यावर असा देव आणखी कुठे भेटणार? तेव्हा राहतील, फक्त त्याच्या आठवणी,आपल्या डोळ्यात मात्र फक्त पच्छातापाचे पाणी.
----------------------------------
Reg ID: BF25-5525
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.