Submission 2904

सूर्यफूल

Submitted By: Meena Shivaji Patil

----------------------------------

एकदा एका वेडीला लागली सूर्याची आस रात्रंदिवस तिच्या मनी त्याचाच ध्यास काळजीने आईवडील बोलले, पोरी नादान तुझे वय जरी सोळा तो तर आहे धगध‌गता एक तेजाचा गोळा शेकडो मैल असतो तो आपल्यापासून दूर सात जन्म घेतले तरी नाही जमणार सूर सूर्यदेवताच्या असंख्य लेकरांपैकी एक आहोत आपण पोरी केव्हा ग सुचणार तुला शहाणपण? समजण्यापळीकडे गेली होती बिचारी पोर अकालीच तुटली तिच्या आयुष्याची दोर विरहाने होरपळलेल्या देहाची झाली बी काळी कोमल मनाची नाजूक पिवळी पाकळी जबरदस्त होती तिला पडलेली सूर्याची भूल जन्मास आली पुन्हा बनून सुंदर सूर्यफूल.

----------------------------------

Reg ID: BF25-5480

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

19
Votes
423
Views
1 Year
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top