मैत्री
Submitted By: Neha Joshi
----------------------------------
मैत्री नावाच्या, जावे गावा, स्वछंद आनंद, विहरण्यात गोडवा सहवास मैत्रीचा,मस्त विसावा! साऱ्याच नात्यात, राग रुसवा, जपते मैत्री, भावनांचा ओलावा, मैत्रीचा धागा,विश्वास जपावा, मजेची उधळण, वयाचा विसर व्हावा! जाणते मैत्री, भाव नजरेचा, कधी धडाही देते, समजेचा, बंध मैत्रीचा, नाजूक नात्याचा, मार्ग देते,सहज जगण्याचा! नित्य जावे, या गावा, सुखाच्या अनुभूतीचा ठेवा, या गोड नात्यास जपूया रम्य आठवणी, मैत्रीत रमूया!
----------------------------------
Reg ID: BF25-5254
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.