Submission 1461

मानवा मानवा किती स्वार्थी झालास तू

Submitted By: Kishor Rajaram patil

----------------------------------

मानवा मानवा किती स्वार्थी झालास तू... वसुंधरेवरवरील सर्वात बुद्धिमान विकासाच्या मागे धावून चंगळवादाच्या अधीन झालास तू... मायनिंग ने डोंगर पोखरले झाडे ,झुडपेही नष्ट झाली प्राण्यांची शिकार करून पर्यावरणाचा वैरी झालास तू..... वाहने वाढली, रस्ते झाले जागतिकीकरणाने जग जवळ आले आधुनिकीकरणाची ही स्वप्न बघत बघत पर्यावरणापासून दूर गेलास तू... मानवाचे भविष्य आहे धोक्यात याचे भान जरा तरी ठेव वनराईचे रक्षण करून निसर्गाचा विनाश थांबव की रे तू... तूच आहेस रक्षक ,तूच आहेस भक्षक याची जरा जाण ठेव निसर्गाच्या प्रत्येक घटकाला वाचवून मानवाचा धर्म निभाव की रे तू....

----------------------------------

Reg ID: BF25-5030

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

0
Votes
114
Views
11 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top