समजून घेशील का?
Submitted By: Ananya C. Joni
----------------------------------
खटकतात अनेक गोष्टी, तरीही, भावना दडपून, अबोलच राहतोस. तुझ्या मनाचं मौन, आता झुगारून दे! तुझ्या या अव्यक्ततेचं, खरं कारण सांगशील का? सूर्याच्या पहिल्या किरणांपासून, रात्रीच्या अंधारापर्यंत, तुझी सावली व्हायचंय मला... पण, तू माझं असणं, मनापासून स्वीकारशील का? जबाबदारीचं ओझं, नाहीये माझं प्रेम. स्वातंत्र्याचे पंखच असतील त्याला... पण, तू त्या भरारीला, परवानगी देशील का? तुझ्या क्षमतांवर, प्रचंड विश्वास आहे माझा. पण, माझ्या प्रेमाला तू, निष्ठेने आधारशील का? कधीतरी तू, मला समजून घेशील का?
----------------------------------
Reg ID: BF25-5854
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.