Submission 3116

शोध स्वतःचा – आयुष्याच्या पानावर

Submitted By: Santosh Kallappa Bongale

----------------------------------

"आयुष्याच्या पानावरती काहीतरी लिहावं, मुक आहे त्यास बोलकं करावं. रीत असून गंमत नाही,काहीतरी वाचण्यास असावं. कोरं असून चालत नाही, काहीतरी भरावं, आयुष्याच्या पानावर काहीतरी लिहावं. स्वतःचं पान स्वतःच वापरावं,दुसऱ्याचं अनुकरण करण्यात वाया का घालवावं? काहीतरी लिहावं म्हणून का कोरं पान संपवावं? पुन्हा मिळत नाही – फक्त तीन पाने जपावं. एकदा लिहिलेलं पुसून पुन्हा लिहिता येत नाही. पुरवणी काही मिळत नाही. जपून योग्य वापरावं,पान गहाळ होता कामा नये, जिवापाड जपावं. स्वतःची पाने लिहून इतिहास काही रचावा, रितं ठेवतो म्हटलं तरी आपोआप भरावं. सटवाईच्या मार्गात न रंगता सत्कर्मावर रंगवावं, आयुष्याच्या पानावर काहीतरी लिहावं. काहीतरी लिहिता लिहिता,"मी कोण?" हे जाणावं, आयुष्याच्या पानावर काहीतरी लिहावं."

----------------------------------

Reg ID: BF25-5572

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

52
Votes
462
Views
11 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top