नारी सन्मान
Submitted By: Poets Priya Injal
----------------------------------
ना मिळावा अश्या समजात जन्म जिथे हा देह रक्ताने माखेल, स्त्री स्वतंत्र आहे हे ज्ञान आता फक्त पुस्तकच राखेल स्वतःच्या बहिणीच्या रक्षणासाठी सिंह अन् इतरांसाठी लोभी ना व्हावा, कृष्णा सम द्रौपदी समजून प्रत्येक स्त्रीला नारी सन्मान देता यावा कलियुगात ही प्रत्येक स्त्री सर्वतोपरी सुरक्षित असेल, जेव्हा प्रत्येक मुलाला स्त्री मध्ये माता भगिनी दिसेल मान राखावा देविसारखा देव देवतांसम नारी सन्मान जपवा, नारी शक्तीचा अपमान न करता प्रत्येकामध्ये द्रौपदी साठी एक कृष्ण लपवा प्रत्येक सुंदर नात्यात सुद्धा ही मर्यादा असावी, स्वतःच्या सुखासाठी कोणाचं आयुष्य संपवण्याची वृत्ती नसावी बंद खोलीत सुद्धा तिला सुरक्षित वाटावं, असं स्थान प्रत्येक स्त्रीच्या मनात पुरुष जातीने गाठावं..
----------------------------------
Reg ID: BF25-5527
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.