माझे झाले
Submitted By: Anand C Menasi
----------------------------------
होते नशिबी जितके, तितके झुरून झाले मी गोष्ट एक संपलेली,माझे सरून झाले राहिला नाही वाव विस्कटण्यास अजुनी नाही शेष काही ही,पूर्ण विखरून झाले होत नाही जीवाचा कोंडमारा आता उगा माझ्या हिस्स्याचे कधीच गुदमरून झाले येऊ दे मरण कधी ही,झाली माझी तयारी आता नाही भीती,खूपदा थरथरून झाले होतो दिवा म्हणे मोठा विझण्या अगोदरी जर्जरीत मन माझे हे पुन्हा तरुण झाले मृत्यु म्हणजे असणार आणखीन ते काय होते जितके मरायचे तितके मरून झाले कोण देव येईल आता कसा इथे मदतीला अवतार ते सारे,केंव्हाचे अवतरून झाले
----------------------------------
Reg ID: BF25-5512
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.