Submission 2936

माणुसकी

Submitted By: Pratibha M. Patil

----------------------------------

उद्याची काळजी आज नसावी, कोण आहे की नाही सोबत याचीही चिंता नसावी... येताना एकटे आलो जातानाही एकटेच जाणार, मतलबी मनाला कधी बर हे समजणार...? मन मारून जगणं आता सोडून द्यावं, अहो येताना काही आणलच नाही, तर जाताना घेवून तरी काय जावं.....? ""मी"" ""मी"" म्हणणारे खूप गेले होवून, ""मी"" पणा इथेच सोडून शरीर मात्र गेले निघून.... दीड फुटी ती जागा तीही नाहीं येत सोबत, माणूस मात्र आयुष्यभर रुपयासाठी राहतो राबत... म्हणून जगावं फक्त माणुसकीने, आणि मिरवाव त्या माणुसकीच्या अलंकाराने....

----------------------------------

Reg ID: BF25-5491

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

309
Votes
1,771
Views
1 Year
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top