Submission 2914

पाहता तुला...

Submitted By: Archana N Patil

----------------------------------

पाहता तुला मज कविता आठवली तार्‍यांनी लिहून चंद्रास पाठवली ऐकून वर्णन सौंदर्याचे हर्षभराने सृष्टी नाचे क्षण हे होते प्रितीचे तुझ्या माझ्या भेटीचे ही प्रीत जणू मी डोळ्यात साठवली पाहता तुला मज कविता आठवली मी ना कवी होतो ना लेखक कुणा पुस्तकाचा कधी वाटे काय उपयोग अशा मस्तकाचा पण झाला स्पर्श तुझ्या शुभ हस्तकाचा अन् बनलो मी कवी आपल्या कथेचा तुझ्या प्रेमाने हृदयातील जागा दाठवली अन् पाहता तुला मज कविता आठवली..

----------------------------------

Reg ID: BF25-5483

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

40
Votes
332
Views
11 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top