आई – प्रश्न आपल्या मनाचे
Submitted By: Anita Kalmani
----------------------------------
कधी विचारलंस का तू,आईला खरं आवडत काय? तिचा रंग, तिची इच्छा,आपण कधी ओळखतो काय? आपण उठतो अलार्मच्या आवाजाने, पण आईला उठताना कधी घड्याळ लागतय काय? आपण थकतो दोन पावलांनी, आई इतक्या कामांतही कधी थकली काय? आपण शोधतो सुख शहरांच्या रस्त्यात, आईनं सुख आपल्या शिवाय कशात शोधलंय काय? आपण विसरतो तिच्या छोट्या इच्छा, आईनं आपल्या गरजा कधी विसरल्या काय? आपण करतो देवाला रोज प्रार्थना, आईनं स्वतःसाठी कधी मागितलंय काय? कुठे शोधतोस देव मंदिराच्या दारात? आईच्या पायाशी कधी मनापासून नमलंयस काय?
----------------------------------
Reg ID: BF25-5474
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.