Submission 2739

तिच्या जाण्याने

Submitted By: Tejaswini gawade

----------------------------------

मावळतीच्या सूर्यसही हुरुप येई, तुझ्या मोहरत्या पाहण्याने . शब्द आटले ,नशीब फाटले, दुःख दाटले तुझ्या अचानक जाण्याने.... अशक्याचा डोंगर सुद्धा बर्फासम विरून जाई,तुझ्या एकवार हसण्याने. प्रेम भंगले, हृदय तुटले, प्रयत्न हरले तुझ्या अचानक जाण्याने.... निराशेच्या ग्रासातूनी आशेने अंकुर उमलती,तुझ्या तेजस्वी चेहऱ्याने. भान थरकले ,मन गहिवरले, अश्रू बरसले तुझ्या अचानक जाण्याने.... सरतीच्या श्वासापर्यंतसुद्धा का वाटले तुला,त्रास होईल आम्हा तुझ्या असण्याने.. लोक जमले ,स्मशान गाठले , सरण रचले तुझ्या अचानक जाण्याने....

----------------------------------

Reg ID: BF25-5413

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

49
Votes
343
Views
11 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top