Submission 2526

हात हाती घेशील का ..?

Submitted By: Gauri Umesh Patwardhan

----------------------------------

हात हाती घेशील का सांग सख्या हात हाती घेशील का...? चमकणारे दवबिंदू अन् उमलणाऱ्या वेड्या कळ्या, संग आपला बघता खुलती मोगऱ्याच्या गाली खळ्या, सडा घातलेल्या अंगणी—सांग सख्या हात हाती घेशील का...? नाहुनी ओले केस माझे, नयनी काजळ खुलते, कानात तुझा दिलेला मोती नटखट डुलते, आरशात बघताना स्वतःला—सांग सख्या हात हाती घेशील का...? कातरवेळी लांबल्या सावल्या, देव्हाऱ्यात उजळती समई, तुझी वाट पाहून वेड्या मनाला रुसवे-फुगवे नवे नवे येती, अबोला धरूनही हसताना—सांग सख्या हात हाती घेशील का...? रजनीच्या गूढ पडद्याखाली प्रेमरस गोड सांडतो, तुझ्या मिठीत विसावलेलं मन स्वर्गाचा सुखसोहळा मानतो, श्रृंगार झुल्यावर झुलताना—सांग सख्या हात हाती घेशील का...?

----------------------------------

Reg ID: BF25-5292

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

9
Votes
170
Views
10 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top