Submission 2195

"आठवण"

Submitted By: Jyoti Sandeep Motar

----------------------------------

आठवण असते तरी काय? सर्व सुख दुःखाची साठवण तुझ्या असण्यात माझ्या नसण्यात गुंतलेले सारे क्षण म्हणजे ""आठवण"" आनंदाच्या पाऊसात भिजतील ते क्षण, दु:खाच्या सागरात ते क्षणभर ही विसावा न घेतील ते सारे ओघळनारे अश्रुपण ती आहे ""आठवण"" काळोख्या अंधारात पौर्णिमेच्या शितल चंद्राच आपलेपण,ती आहे ""आठवण"" तुझ्या रागातल आपलेपण,ते विरुन गेल्यानंतर आलेल शहाणपंन ती आहे ""आठवण"" क्षणभर आठवेल पण मनभर काहूर माजवेल, आयुष्यात पुन्हा जगावस वाटेल निरभ्र आकाशात पुन्हा उंच भरारी घ्याविशि वाटेल ती आहे ""आठवण"" जगताना कुठले क्षण जगायचं हे शिकवुन जाईल ती आहे तुझी माझी ""आठवण""

----------------------------------

Reg ID: BF25-5204

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

0
Votes
100
Views
10 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top