Submission 1589

लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा

Submitted By: Suraj More

----------------------------------

नववर्षाचा आरंभ अन् तिचं मोहक रुप, जणु काहीं,ती माझ्यासाठी स्वर्गातली अप्सरा. नजर वळवताच तिच्याकडं नयन चक्षू घायाळ झाले, लाल साडीवरच्या हिरव्या पदराने मन माझे मोहून गेले. हा तिचा न् माझा पहिलाच गुढीपाडवा आरंभला असा सुन्दर प्रारंभ भेटावा हे माझं प्रारब्धच असावं. या मंजुलतेची परिभाषा करणं या बेढब लेखकाला अती-बिकटच प्रयत्नांनी परमेश्वर म्हणून प्रयास करीत राहीन, पण तिच्या कातील नजरेनं क्षणात गार होईन साडीमध्ये दिसते टवटवीत फुलून अन् प्रत्यक्षात मात्र उमललेली कळी, पाहताच क्षणी तिला,जातो माझा बळी. एवढं सगळं ऐकून,विचाराल तूम्ही मला, खरच ती आहे का इतकी रुप-सौंदर्यवती ? मज शब्दांना वाटत नाही आता चूक-अचुकतेची भीती.

----------------------------------

Reg ID: BF25-5061

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

1
Votes
109
Views
8 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top