सल - वटलेल्या वृक्षाची
Submitted By: Shashikant Mahadev Patil
----------------------------------
वृक्ष मी एक वटलेला सारी पाने गळून पडलेला मी उभा रस्त्या कडेला तोंड देत वादळ वाऱ्याला अन रणरणत्या उन्हाला मी उभा रस्त्या कडेला सारे दातृत्व हरवून गेलेला अन आधारास मुकलेला मी उभा रस्त्या कडेला पाहात येण्या जाणार्या पांथस्ताला येईल कोणी माझी विचारपूस करायला मी उभा रस्त्या कडेला कोणाचीच साद नाही आसुसल्या मनाला वाटू लागतं मी आता अडगळीतल्या खेळण्यातला मी उभा रस्त्या कडेला
----------------------------------
Reg ID: BF25-5058
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.