Submission 3765

हरवत चालला आहे

Submitted By: Bhagyashri Harshvardhan Patil

----------------------------------

वासुदेव आला हो वासुदेव आला हे गीत ऐकायला खूप कमी मिळते आहे.. भल्या पहाटे येवून ओवी गावून दिवस छान करणारा तो कुठे आहे.. दारावर येणारा देवदूत कुठेतरी दिसेनासा झाला आहे.. आई पदरात दान घाल ग हे गोड आपुलिकीचे बोल ऐकायला कमी येत आहे.. कुतुहुल म्हणून पाहणारी लहान मुलांना अनोळखी वाटतो आहे.. पंढरीच्या वारीत हमखास दिसतो पण गावी दिसेनासा झाला आहे.. त्याच मागणारा गाऱ्हाणं आणि आशीर्वाद कुठेतरी आपले चुकले असे वाटते आहे.. कधी पुस्तकात तरी कधी वारीत दिसतो आपला असून अनोळखी वाटतो आहे.. परत एकदा ये तुझी ओवी भक्ती गीत आम्हा सर्वांना परत ऐकू येऊ दे असे वाटते आहे..

----------------------------------

Reg ID: BF25-5841

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

64
Votes
1,045
Views
10 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top