चिवचिवाट
Submitted By: Jaideep Padmakar Vaidya
----------------------------------
होताच पहाट, सुरू होई पक्ष्यांचा चिवचिवाट, त्यातील एका सुराचा असे निराळाच थाट, हा सूर कधी असे जवळ, कधी असे दूर, मात्र नित्यनेमाने ऐकू येई हा सूर! हा सूर असे जणू माणसाने वाजवलेली शीळ, कोणाची समजेना म्हणून एकदा बसली होती माझी भीतीने दातखीळ, नंतर हा सूर असे शिळकरी कस्तुराचा हे समजलं, निसर्गाची किमया किती न्यारी हे नव्याने उमजलं! आता मात्र ही शीळ ऐकताच आनंदून येई मन, निसर्गातील निरनिराळे आवाज ऐकताच वाटे प्रसन्न, चिवचिवाट करत घरटी बांधतात पक्षी, प्रत्येक घरट्याची निराळीच नक्षी!
----------------------------------
Reg ID: BF25-5253
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.